बाल साहित्य संमेलन

 

 bal sahitya sammelan 2011 competiton form for download 

 

बाल साहित्य संमेलनातून नक्कीच बाल साहित्यिक निर्माण होतील - कु. स्वरुपा सुरोशे

डोंबिवली - न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेतर्फे पहिली ते दहावीतील मुलांनी लिहिलेल्या साहित्याचे संमेलन दरवर्षी भरवतात. यंदाचे डोंबिवलीत भरविण्यात आलेल्या तिसऱया साहित्य संमेलनात बालसाहित्य लिहिणारे मोठे साहित्यिक अध्यक्ष व स्वागताध्यक्ष नव्हते. तर बाल साहित्यिकांनी बालसाहित्य संमेलन भरवून मोठे साहित्यिक असल्याची चुणूक दाखवून दिली. एक दिवसीय बालसाहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमात आपले कलागुण दाखविले. डोंबिवलीत रंगलेल्या या संमेलनात बच्चे कंपनीने या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

डोंबिवलीच्या चारही दिशेने ग्रंथदिंडी मुलांनी टिळकनगर विद्यालयात आणल्यानंतर बालसाहित्य संमेलनाची सुरूवात  ग्रंथदिंडीने झाली. माजी संमोलनाध्यक्ष दक्षता लिंगायत माजी स्वागताध्यक्ष राहुल चोपडे, यंदाची संमेलनाध्यक्षा 10 वीतील स्वरुपा सुरोषे, स्वागताध्यक्ष सागर महाजन, प्रमुख पाहुणा दुसरीतील चेस चॅम्पीयन आर्यन पोलाखरे, श्रद्धा रानडे, स्वराशी जाधव (बाल कलाकार) यांच्या संमवेत रविंद्र प्रभुदेसाई, दिपक मेजारी, अल्लाउद्दीन शेख, असमल शेख, निलेश गायकवाड, रामचंद्र आफळे आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले त्यानंतर चिमुरडय़ा साहित्यिकाने लिहिलेल्या कवितेचा संग्रह `बाल काव्यांजली', कथासंग्रह `बाल मनाचे अंतरंग' या दोन पुस्तकाचे प्रकाशन झाले. याच प्रसंगी व्यास क्रिएशन्सच्या 84 पुस्तकाचे 84 मुलांच्या हस्ते प्रकाशन झाले.

 कु. स्वरुपा सुरोषे हिने आपल्या अध्यक्षीय भाषणात या साहित्य संमेलनामुळे भविष्यात नक्कीच साहित्यिक निर्माण होतील अशी आशा व्यक्त केली.  तिल्लोतमा तेलवणे हिने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची स्मशनातील सोने ही कथा सादर केली. अनिकेत हिर्लेकर या चिमुरडय़ाने `उंदीर मामा'ची गोष्ट सादर केली. संकेत खर्डीकर, मानसी कानेटकरच्या जादूच्या प्रयोगांनी छोटय़ांना भुरळ पाडली. थोडय़ा वेळासाठी छोटय़ांना हे जादूचे प्रयोग पाहून जादूच्या नगरीतून फेरफटका मारल्याचा आनंद मिळाला. घरामध्ये आईला मदत करणारी आणि शाळेची तयारी करण्यास मदत करणारी मोलकरीण एखाद्या दिवशी आली नाही तर काय होते, याची व्यथा अवनी परांजपे हिने मांडली. सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी संस्काराचे महत्व पटवून देणारे `मना घडवी संस्कार' ही बालनाटिका सादर केली. सायली भोसले हिने कथ्थक नृत्याचा अविष्कार सादर केला. तसेच स्पर्धात्मक युगाचा मुलांवरील परिणाम हा परिसंवादही महत्वाचा ठरला. सदर कार्यक्रमाचे आयोजन गेले तिन वर्षापासून न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थे करते.

चौथे बाल साहित्य संमेलन कोल्हापूर येथे होणार असल्याचे  न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत तुपदाळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.

ा------------------ö

संमेलनाध्यक्षा स्वरुपा सुरोशे इतर मान्यवरासमवेत संमेलनाचे उदघाटन करताना